मुंबईत १०० नवे कोरोना बाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत १०० नवे कोरोना बाधित
मुंबईत १०० नवे कोरोना बाधित

मुंबईत १०० नवे कोरोना बाधित

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : मुंबई महापालिका क्षेत्रात आज १०० नवे कोरोना रुग्ण आढळले. आता मुंबईतील रुग्णांची संख्या १,०६०,०७० वर गेली आहे. दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५६३ एवढ्यावर स्थिर आहे.
सध्या शहर उपनगरात ६३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात १०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. एकूण १,०३९,८७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात निदान झालेल्यांपैकी ९८ रुग्ण लक्षणेविरहित आहेत. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८,०७९ दिवसांवर येऊन ठेपला आहे. पालिकेने गेल्या २४ तासांत रुग्णांच्या संपर्कातील एकूण ६९४ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. मुंबईत एकूण १,०६०,०७० कोरोनाबाधित असून मृतांची संख्या १९ हजार ५६३ इतकी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06044 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top