मुंबईतील ७५ टक्के मशिदीने भोंगे लावण्याची घेतली रीतसर परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील ७५ टक्के मशिदीने भोंगे लावण्याची घेतली रीतसर परवानगी
मुंबईतील ७५ टक्के मशिदीने भोंगे लावण्याची घेतली रीतसर परवानगी

मुंबईतील ७५ टक्के मशिदीने भोंगे लावण्याची घेतली रीतसर परवानगी

sakal_logo
By

मुंबईतील ७५ टक्के मशिदींनी
भोंगे लावण्याची घेतली रीतसर परवानगी

मुंबई, ता. ३ : ४ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मुबईतील अनेक मशिदी अधिकृत परवानगी घेण्यासाठी पुढे आल्या आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ८०३ मशिदींवर भोंगे लावण्याची परवानगी दिल्याची माहिती पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी दिली. परवानगी देण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या नियमानुसार परवानग्या देण्यात आल्या असून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भोंगे वाजवता येणार आहेत, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. शहरात एकूण १,१४४ एवढ्या अधिकृत मशिदी आहेत. म्हणजे जवळपास ७५ टक्के मशिदींनी लाऊडस्पीकरवरून अजान म्हणण्यासाठी रीतसर परवानगी घेतली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06048 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top