
सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव होण्याची संधी
मुंबई, ता. ४ : पर्यटनासाठी उत्तम काम करणाऱ्या गावांना सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाकडून विभागीय स्तरावर सहा उप-संचालकांना व जिल्हा परिषदांच्या ३३ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे यूएनडब्ल्यूटीओ सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील सर्व गावांकडून अधिकाधिक सहभाग नोंदवला जावा यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेने नमूद केलेल्या तीनपैकी कोणत्याही श्रेणीत गावांना अर्ज करता येणार आहे. सर्वोत्तम गावे, सर्वोत्तम पर्यटन आणि गावांचे नेटवर्कसाठी ते अर्ज करू शकतात. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेकडून ‘बेस्ट टुरिझम व्हिलेज’ नामांकनाकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. यंदाच्या नामांकनासाठी prakash.om50@nic.in आणि gargi.mittal@gov.in ई-मेलवर १५ मे २०२२ पूर्वी अर्ज करावयाचा आहे.
कमी लोकसंख्या घनता व जास्तीत जास्त १५ हजार रहिवासी, पारंपरिक उपक्रम (शेती, जंगल, पशुपालन किंवा मासेमारी) आणि सांस्कृतिक व सामाजिक देवाणघेवाण अशी पात्रता नामांकनासाठी ठेवण्यात आली आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जांचे संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेकडून सल्लागार मंडळामार्फत ठराविक मुद्द्यांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे.
प्रत्येक गावात ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत करण्याकरिता पंचायत समिती स्तरावर अधिकारी-कर्मऱ्यांची नेमणूक करण्याची सूचना केली आहे. २०२१ मध्ये तेलंगणा राज्यातील पोचमपल्ली गावास सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटनाचे नामांकन देण्यात आले होते. यंदाच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी अर्ज करावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यांनी सांगितले.
इथे करा अर्ज
www.unwto.org/tourism-villages संकेतस्थळाला भेट द्या. आपल्या गावातील पंचायत सदस्यांपर्यंत माहिती पोहचवा. अर्ज थेट ‘यूएनडब्ल्यूटीओ’कडे न पाठवता केवळ prakash.om50@nic.in आणि gargi.mittal@gov.in वर पाठवावेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06051 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..