उन्हाळ्यात गोव्यासाठी विशेष रेल्वे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उन्हाळ्यात गोव्यासाठी विशेष रेल्वे
उन्हाळ्यात गोव्यासाठी विशेष रेल्वे

उन्हाळ्यात गोव्यासाठी विशेष रेल्वे

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनेक जण गोव्याला जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांना प्रतीक्षायादी असते. गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून एलटीटी ते थिविदरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सीएसएमटी ते मनमाडदरम्यानही उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. या सर्व उन्हाळी विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह आरक्षण सुरू झाले आहे. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून आरक्षण करता येणार आहे.

१. गाडी क्रमांक ०१०४५/४६ एलटीटी-थिवि-एलटीटी या उन्हाळी विशेष गाडीच्या ६ मे ते २४ मेपर्यंत १० फेऱ्या एक दिवसाआड चालवण्यात येणार आहेत.
---
२. गाडी क्रमांक ०२१०१/०२ सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी दैनिक विशेष रेल्वेच्या १६ मे ते ३० जूनपर्यंत ४६ फेऱ्या चालवण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06052 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top