राज्यात दिवसभरात कोरोनाचे १८८ रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात दिवसभरात कोरोनाचे १८८ रुग्ण
राज्यात दिवसभरात कोरोनाचे १८८ रुग्ण

राज्यात दिवसभरात कोरोनाचे १८८ रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : बुधवारी राज्यात १८८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कालच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७८,७८,३६३ वर गेली आहे. आज १६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२९,४६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण १०४९ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.
राज्यात बुधवारी एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्युदर १.८७ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०२,७०,६९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७८,३६३ (०९.८४ टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06059 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top