
टाटा पॉवरचा गुजरातमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प
टाटा पॉवरचा गुजरातमध्ये सौरऊर्जा प्रकल्प
मुंबई, ता. ४ : टाटा पॉवर कंपनीने गुजरातमधील मेसांका येथे १२० मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प कार्यान्वित केला आहे. हा प्रकल्प गुजरात सरकारसाठी वार्षिक ३०५२४७ एमडब्ल्यूएच इतके उत्पादन करणार आहे. या प्रकल्पामुळे टाटा पॉवरची एकूण वीजनिर्मितीची क्षमता तीन हजार ५२० मेगावॉट झाली आहे.
मेसांका येथील सौरऊर्जा प्रकल्पात सुमारे ३.८१ लाख मॉड्युल्स वापरले गेले आहेत. विविध वॅटेज आणि ४४० ते ४६० डब्ल्यूपी क्षमतेच्या हार्नेसच्या काचेच्या मॉड्युल्सवरील पातळ फिल्म ग्लासचा वापर प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे. मेसांका येथील १२० मेगावॉट विजेच्या वाढीसह टाटा पॉवरची क्षमता आता दोन हजार ५८८ मेगावॉट सौरऊर्जा आणि ९३२ मेगावॉट पवन ऊर्जेसह तीन हजार ५२० मेगावॉट झाली आहे. पाच महिन्यांच्या अल्प कालावधीत गुजरातमधील मेसांका येथे १२० मेगावॉटचा सौरप्रकल्प सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटतो, असे टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीर सिन्हा म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06060 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..