शाळा सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके
शाळा सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके

शाळा सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : राज्यात जून महिन्याच्या १३ तारखेला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार असून त्यापूर्वीच सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप केले जाते. त्या पुस्तकांच्या पहिल्या वितरणाचा प्रारंभ आज गायकवाड यांच्या हस्ते ‘बालभारती’च्या गोरेगाव भांडारात हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक कैलास पगारे, ‘बालभारती’चे नियंत्रक विवेक गोसावी, मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी इंदरसिंग गडाकोटी, शिक्षण निरीक्षक देविदास महाजन आदी उपस्थित होते.

पुणे येथील बालभारती भांडारात समग्र शिक्षा अभियान वितरणास राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. या वेळी माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, प्राथमिक संचालक दिनकर टेमकर, ‘बालभारती’चे संचालक कृष्णकुमार पाटील, वित्त व लेखा अधिकारी भारती देशमुख, अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी उज्ज्वला ढेकणे आदी उपस्थित होते.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका, कटक मंडळे तसेच अनुदानित शाळांना राज्य शासनातर्फे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून २०२२ पासून राज्यातील शाळा नियमितपणे सुरू होत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या अन्य विभागीय भांडारांतूनही मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

यंदा ५ कोटी ४० लाख प्रतींचा पुरवठा
शालेय वर्ष २०२२-२०२३ करिता एकूण पाच कोटी ४० लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचवण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. समग्र शिक्षा अभियानाव्यतिरिक्त पहिली ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06064 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top