गावसकरांकडून म्हाडाचा भूखंड परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावसकरांकडून म्हाडाचा भूखंड परत
गावसकरांकडून म्हाडाचा भूखंड परत

गावसकरांकडून म्हाडाचा भूखंड परत

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी म्हाडाने ३४ वर्षांपूर्वी वांद्रे पश्चिम येथील भूखंड देण्याचा निर्णय घेतला; मात्र या भूखंडावर आजवर प्रशिक्षण केंद्र उभारणे शक्य न झाल्याने अखेर गावसकर यांनी हा भूखंड परत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच पत्र गावसकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिले आहे.
म्हाडामार्फत जागतिक बँक प्रकल्पांतर्गत विविध संस्थांना भूखंडांचे वाटप केले होते; मात्र अनेक भूखंड वापरविना पडून असल्याने या भूखंडांचे वाटप रद्द करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने काही प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे पाठवले होते. त्यापैकी माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा भूखंड कायम ठेवण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने १५ सप्टेंबर २०२१ मध्ये घेतला होता. त्यानुसार ३० दिवसांच्या आता म्हाडासोबत भाडेकरारनामा करण्याचे बंधन घालण्यात आले होते. त्यानुसार म्हाडाने कराराची प्रत गावसकर यांना पाठवलीही होती; मात्र यावर त्यांचे कोणतेही उत्तर न आल्याने भूखंड ताब्यात देण्याची प्रक्रिया रखडली होती. अखेर सुनील गावस्कर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पत्र पाठवून भूखंड परत करत असल्याचे कळवले आहे. याबाबत म्हाडा अधिकाऱ्यांना विचारले असता पत्राबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06065 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top