
‘स्थगन’वरील दबावाबाबत कुलगुरूंना पत्र
मुंबई, ता. ५ : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट अधिवेशनात सिनेट सदस्यांनी उपस्थित केलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा होण्यापूर्वी त्यावर काही जण दबाव आणून ते मागे घ्यायला भाग पाडतात. त्याचा एक नवा पायंडा विद्यापीठात निर्माण झाला आहे. विद्यार्थी, शिक्षकांचे आणि इतर महत्त्वाचे शैक्षणिक प्रश्न सुटणे त्यामुळे कठीण झाले आहे. हे मुद्दे उपस्थित करणारे पत्र सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी कुलगुरूंना लिहिले आहे.
त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांना सविस्तर पत्र लिहून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. थोरात म्हणाले की, सिनेटमध्ये स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होते, परंतु विद्यापीठात वर्षातून केवळ दोनच सिनेट अधिवेशने होतात. त्यातही अलीकडे हे स्थगन मागे घेण्यासाठी सिनेट सदस्यांवर दबाव आणला जातो. त्यामुळे कोणतेही प्रश्न सुटले जात नाहीत. परिणामी स्थगन हे केवळ एक औपचारिकता बनले असल्याची खंतही थोरात यांनी व्यक्त केली.
...
कारवाई का नाही?
यासंदर्भात ७ डिसेंबर २०१८ रोजी कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी प्रत्येक प्रश्नाला १५ दिवसांत उत्तर दिले जाईल, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु आतापर्यंत एकाही अधिकाऱ्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे.
...
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06069 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..