भोंग्यांचा आवाज 55 डेसीबील पेक्षा कमी ठेवावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोंग्यांचा आवाज 55 डेसीबील पेक्षा कमी ठेवावा
भोंग्यांचा आवाज 55 डेसीबील पेक्षा कमी ठेवावा

भोंग्यांचा आवाज 55 डेसीबील पेक्षा कमी ठेवावा

sakal_logo
By

भोंग्यांचा आवाज ५५ डेसिबलपेक्षा कमी ठेवावा
मुंबई पोलिस आयुक्तांचे सर्वधर्मीय धर्मगुरूंना आवाहन

मुंबई, ता. ४ : सध्या सुरू असलेल्या भोंगे प्रकरणाबाबत सामाजिक आणि धार्मिक वातावरण चिघळले आहे. भोंगे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी बुधवारी (ता. ४) सर्वधर्मीय धर्मगुरूंशी संवाद साधला. प्रत्येक प्रार्थनास्थळावरील भोंग्यांचा आवाज ५५ डेसिबलपेक्षा कमी ठेवावा, अशा सूचना त्यांनी धर्मगुरूंना दिल्या.
बुधवारी पहाटेपासून मुंबई पोलिसांचा शहरात कडक बंदोबस्त होता. संजय पांडे यांच्यासह सह पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी शहरातील मशिदी, हिंदू मंदिरे, जैन मंदिरे, चर्च, गुरुद्वारा आणि अन्य धार्मिक स्थळांच्या सुमारे १०० प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेतली. बैठकीत आयुक्तांनी कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. महिनाभरापासून त्याबाबत चर्चा आणि बैठका घेतल्या जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मंदिर व मशीद प्रशासनाकडून भोंग्यांच्या परवानगीसाठी आयुक्तालयात अर्ज येऊ लागले आहेत. मुंबईत एकूण दोन हजार ४०४ मंदिरांची नोंद असून मंगळवारपर्यंत परवानगीसाठी मंदिरांकडून फक्त २८ अर्ज आले आहेत. त्यातील २० जणांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत एक हजार १४४ मशिदी आहेत. त्यातील ९४४ मशिदींनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. ९२२ मशिदींना आतापर्यंत परवानगी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फक्त अंदाजे एक टक्का मंदिरांनी परवानगी घेतली.

कार्यकर्त्यांना अटक
भोंग्यांद्वारे अजान वाजवणाऱ्या मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करणाऱ्या घटनांची चारकोप आणि चांदिवलीमध्ये नोंद झाली आहे. त्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा सहभाग होता. त्यांना एक हजार दोनशे रुपयांचा दंड करण्यात आला आहे. मुंबईतील प्रत्येक भागात मनसे पदाधिकारी आणि कार्यकत्यांची शोध मोहीम पोलिसांकडून सुरू होती. धारावीत चार मनसे पदाधिकाऱ्यांना महाआरतीसंदर्भात पोलिसांनी ताब्यात घेऊन १५१ (२) कलमांतर्गत अटक केली आहे. संदीप कदम, कौशिक कोळी, संदीप कवडे आणि प्रमोद रसाळ अशी त्यांची नावे आहेत. आरसीएफ पोलिसांनीही एकाला अटक केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06070 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top