डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथांचे प्रकाशन पुन्हा लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथांचे
प्रकाशन पुन्हा लांबणीवर
डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथांचे प्रकाशन पुन्हा लांबणीवर

डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथांचे प्रकाशन पुन्हा लांबणीवर

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीच्या सहा ग्रंथांचा प्रकाशन सोहळा पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. कार्यक्रम दोन वेळा निश्चित करूनही तो पुढे ढकलण्यात आल्याने प्रकाशन सोहळा नेमका कधी होईल, असा सवाल विचारला जात आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे येथे कार्यक्रम घेण्याचे नियोजित करण्यात आले होते; मात्र काही कारणास्तव उच्च शिक्षण विभागाने प्रकाशन सोहळा ३० एप्रिल रोजी रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्याचे नियोजित केले. त्यावेळीही चरित्र प्रकाशन समितीच्या सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा एकदा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आता नव्या तारखेचे नियोजन करण्यात आले नसल्याने वाचक, अभ्यासक आणि चरित्र साधन समितीशी संबंधित सदस्यही हा प्रकाशन सोहळा कधी होणार, असा सवाल करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06073 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top