
मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी अनुदान मिळणार
मुंबई, ता. ५ ः अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी संस्था नोंदणी अधिनियम १८६० आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थांना २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी सहायक अनुदान देण्याकरिता पात्र संस्थांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. संबंधितांना ६ मे ते ६ जून या कालावधीत अर्ज करता येतील.
साहित्य संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या व महाराष्ट्रात अन्य मराठी साहित्य संमेलन घेणाऱ्या साहित्य संस्था अनुदानासाठी अर्ज करू शकतील. साहित्यबाह्य क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणजेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विज्ञान, क्रीडा, कृषी, आरोग्य, पर्यावरण व अध्यात्मिक आदी क्षेत्रांत काम करणाऱ्या बहुउद्देशीय संस्थांना अनुदानासाठी अर्ज करता येणार नाही. विहित नमुन्यातील अर्ज व नियमावली www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या www.sahitya.marathi.gov.in संकेतस्थळावरही अर्ज उपलब्ध होतील. सदर अर्ज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई (०२५२२२४३२ किंवा ०२५२२५९३१) या ठिकाणी विहित कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या अर्जांचा अनुदानासाठी विचार केला जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे प्रपाठक रामेश्वर रोकडे यांनी कळवले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06074 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..