राज ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरे यांच्यावर 
राजद्रोहाचा गुन्हा नोंदवा
राज ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवा

राज ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवा

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : राज्यभरात मशिदी आणि मंदिरांवरील भोंग्यांवरून राजकारण सुरू असताना आता चिथावणीखोर भाषण केल्याच्या आरोपात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यामुळे राज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे. शुक्रवारी (ता. ६) मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठापुढे याचिकेचा उल्लेख करण्यात येणार आहे. मनसैनिकांना मशिदीबाहेर हनुमान चालिसेचे पठण करण्याबाबत चिथावणीखोर विधाने करणे तसेच सामाजिक आणि धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न ठाकरे करत आहेत, असा आरोप याचिकेत केला आहे.
---
सभांवर बंदी घाला
मशिदींवरील भोंगे काढा, अन्यथा परिणाम वाईट होतील, असे अल्टिमेटम महाविकास आघाडी सरकारला देऊन कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. तसेच राज यांचे दौरे, पत्रकार परिषद आणि जाहीर सभांवर तूर्तास बंदी घालावी, अशीही मागणी करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06079 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top