राणा दाम्पत्याची कारागृहातून सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणा दाम्पत्याची कारागृहातून सुटका
राणा दाम्पत्याची कारागृहातून सुटका

राणा दाम्पत्याची कारागृहातून सुटका

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या हट्टापायी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना तुरुंगाची हवा खावी लागली. मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी (ता. ४) जामीन मंजूर केल्यानंतर आज (ता. ६) नवनीत राणांची भायखळा कारागृहातून; तर रवी राणा यांची तळोजा कारागृहातून सुटका झाली. दरम्यानन, प्रकृती खालावल्याने नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या इराद्याने राणा दाम्पत्य २२ एप्रिल रोजी मुंबईत दाखल झाले होते; मात्र मुंबई पोलिसांची नोटीस आणि शिवसैनिकांच्या आंदोलनामुळे राणा दाम्पत्याला त्यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर पडता आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे हनुमान चालिसा पठण करण्याचा संकल्प रद्द करत असल्याचे राणांनी जाहीर केले. दरम्‍यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरमी राणा दाम्पत्यावर राजद्रोहासह वेगवेगळे गुन्हे दाखल करत अटक करण्यात आली. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सुनावणीनंतर बुधवारी (ता. ४) राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाला. त्यानंतर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहातून, रवी राणा यांची तळोजा कारागृहातून सुटका झाली.
---
जे. जे.तून लीलावतीत!
नवनीत राणा यांना रक्तदाब, मणक्याचे दुखणे, छातीत दुखण्याचा त्रास होत असल्याने भायखळा कारागृहातून जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले; मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दुपारच्या सुमारास लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रवी राणा यांची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर ते थेट नवनीत यांच्या भेटीसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले. तब्बल दोन आठवड्यानंतर भेट झाल्याने नवनीत यांना अश्रू अनावर झाले.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06081 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top