राज्य सीईटी सेलच्या आयुक्तपदी वनमाथी सी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य सीईटी सेलच्या 
आयुक्तपदी वनमाथी सी.
राज्य सीईटी सेलच्या आयुक्तपदी वनमाथी सी.

राज्य सीईटी सेलच्या आयुक्तपदी वनमाथी सी.

sakal_logo
By

मुंबई ता. ५ ः राज्य सीईटी सेलच्या आयुक्तपदी वनमाथी सी. यांची नियुक्ती करण्यात आली. त्या २०१५ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून त्यांची बदली राज्य सीईटी सेलच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत त्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली.
गेल्या महिन्यात सामान्य प्रशासन विभागाने के. व्ही. जाधव यांची सीईटी सेलच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती; मात्र काही कारणास्तव त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. त्यामुळे रवींद्र जगताप यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला. त्यानंतर आता वनमाथी सी. यांची सीईटी सेलच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06083 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top