जितेंद्र नवलानींविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जितेंद्र नवलानींविरोधात गुन्हा दाखल
जितेंद्र नवलानींविरोधात गुन्हा दाखल

जितेंद्र नवलानींविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : जितेंद्र नवलानी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे गोळा केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे ‘एसीबी’ने म्हटले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत नवलानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवलानी यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप केले होते.
नवलानी यांनी विविध खासगी कंपन्यांकडून ईडी अधिकाऱ्यांच्या नावाने काम करून देण्यासाठी पैसे गोळा केले. २०१५ ते २०२१ या कालावधीत नवलानी यांनी जवळपास ५८ कोटींपेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. हे पैसे त्यांनी स्वतःकडे आणि त्यांच्या मालकीच्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून घेतल्याचे एसीबीने म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06084 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top