माजी संचालक जॉय थॉमस यांच्याविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी संचालक जॉय थॉमस 
यांच्याविरोधात गुन्हा दाखल
माजी संचालक जॉय थॉमस यांच्याविरोधात गुन्हा दाखल

माजी संचालक जॉय थॉमस यांच्याविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमसवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. थॉमस यांच्यासह बांधकाम व्यावसायिक लक्ष्मीचंद दामजी छेडा, हंसा छेडा यांच्याविरुद्ध कलम ४०६, ४०९, ४२०, १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या संदर्भात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
थॉमस पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक असताना तारण असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सदनिकांवर नियमबाह्य पद्धतीने १११.५४ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मे. सुद्रथ कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे संचालक लक्ष्मीचंद दामजी छेडा आणि हंसा छेडा यांना कर्ज दिले होते. छेडा यांनी कर्जासाठी बँकेत तारण ठेवलेली सदनिका यापूर्वीच बँकेकडे तारण ठेवली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06085 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top