राज्यात कोरोनाचे २३३ नवीन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात कोरोनाचे २३३ नवीन रुग्ण
राज्यात कोरोनाचे २३३ नवीन रुग्ण

राज्यात कोरोनाचे २३३ नवीन रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : गुरुवारी राज्यभरात कोरोना संसर्गाच्या २३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या अनेक महिन्यांच्या तुलनेत आजची संख्या जास्त आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७८,७८,५९६ झाली आहे. आज १७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२९,६४२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ११०९ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात गुरुवारी एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
सध्या राज्यातील मृत्युदर १.८७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०२,९७,१३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७८,५९६ (०९.८४ टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत कोरोनाने १३० जण बाधित
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात आज १३० नवे कोरोना रुग्ण आढळले. आता मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १,०६०,३१७
झाली आहे. एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५६३ एवढ्यावर स्थिर आहे. सध्या शहर उपनगरात ६८२ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ९० रुग्ण बरे होऊन घरी गेले. ७,४४,७३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७९१५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. ६ ते १४ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.००७ टक्क्यांवर आहे. पालिकेने मागील २४ तासांत रुग्णांच्या संपर्कातील एकूण ८१५ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. मुंबईत एकूण १,०६०,३१७ कोरोना बाधित असून मृतांची संख्या १९ हजार ५६३ इतकी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06087 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top