पाच हजार रेल्वे प्रवाशांचा ‘गारेगार’ प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच हजार रेल्वे प्रवाशांचा ‘गारेगार’ प्रवास
पाच हजार रेल्वे प्रवाशांचा ‘गारेगार’ प्रवास

पाच हजार रेल्वे प्रवाशांचा ‘गारेगार’ प्रवास

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर धावणाऱ्या एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर आजपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. सुधारित तिकीट दर लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी एसी लोकलला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. दुपारी २ वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून पाच हजारांहून अधिक प्रवाशांनी ‘गारेगार’ प्रवास केल्याची नोंद झाली आहे.

एसी लोकलचे तिकीट भाडे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने त्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे एसी लोकलचे तिकीट दर कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. त्याची दखल घेऊन तिकीट दरात ५० टक्के कपातीची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच केली. आजपासून सुधारित तिकीट दर लागू झाले. पहिल्याच दिवशी एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलच्या २ हजार ३०८ तिकिटांची विक्री झाली. २ हजार ५०० प्रवाशांनी प्रवास केला. पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलच्या दोन हजार ४४९ तिकिटांची विक्री झाली असून २ हजार ६८१ प्रवाशांनी प्रवास केला.

दुपारच्या उन्हात कमी गर्दी
सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी एसी लोकलमध्ये प्रवाशांची जास्त संख्या होती. मात्र, कडाक्याच्या उन्हाच्या वेळी दुपारच्या सुमारास प्रवाशांची गर्दी कमी असल्याचे दिसून आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06090 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top