म्हाडा भरतीमधील उमेदवारांची संवर्गनिहाय सूची जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडा भरतीमधील उमेदवारांची संवर्गनिहाय सूची जाहीर
म्हाडा भरतीमधील उमेदवारांची संवर्गनिहाय सूची जाहीर

म्हाडा भरतीमधील उमेदवारांची संवर्गनिहाय सूची जाहीर

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : म्हाडाच्या सरळ सेवा भरती परीक्षेत यशस्वी झालेल्या १,६३० परीक्षार्थींना कागदपत्रे सादरीकरण आणि पडताळणीसाठी बोलावण्यात येणार आहे. उमेदवारांची संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कागदपत्रे तपासणीचे वेळापत्रक उमेदवारांना पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे.
म्हाडा प्रशासनातर्फे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता, कनिष्‍ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक, सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सर्वेअर, ट्रेसर, स्टेनोग्राफर, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आदी १४ संवर्गांतील तांत्रिक व अतांत्रिक पदांच्या ५६५ पदांसाठी ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२२ दरम्यान परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेतील १,६३० उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांची अर्जावरील आणि परीक्षा केंद्रावर काढण्यात आलेली छायाचित्रे जुळत नाहीत किंवा ज्यांचे लॉग डिटेल्स शंकास्पद आहे किंवा उमेदवारांचे परीक्षा केंद्रावरील वर्तन आक्षेपार्ह आढळून आले आहे, अशा उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येणार आहेत. त्याबाबत योग्य यंत्रणेमार्फत चौकशी करून सर्व काही योग्य आढळून आल्यानंतरच त्यांचे निकाल घोषित करण्यात येतील; अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती म्हाडा प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06093 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top