
म्हाडा वसाहतींचा समूह पुनर्विकास
मुंबई, ता. ६ : म्हाडा वसाहतींमधील एकल इमारतींच्या पुनर्विकासामुळे पायाभूत सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे म्हाडा अभिन्यासातील नियोजित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यापुढे एकल इमारतीच्या पुनर्विकास प्रस्तावाला मान्यता देऊ नये. केवळ एकत्रित पुनर्विकासाच्या प्रस्तावांनाच मान्यता देण्यात यावी, असा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला.
म्हाडा वसाहतीमधील एकल इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागला आहे; मात्र त्यातून पायाभूत सुविधांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे गृहनिर्माण विभाग वसाहतींचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा विचार करत आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसतानाच एकल इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव म्हाडाकडे मंजुरीसाठी येत आहेत. त्यामुळे या वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा उभारणे किंवा याचे नियोजन करणे शक्य होणार नाही. एकल इमारतींच्या पुनर्विकासाला मान्यता दिल्यास संपूर्ण क्षेत्राचा समूचित विकास योजनाबद्ध पद्धतीने होणार नसल्याने गृहनिर्माण विभागाने एकल इमारतींच्या पुनर्विकासाला कोणत्याही परिस्थिती मान्यता देण्यात येऊ नये, असा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे.
--
उल्लंघन केल्यास कारवाई
या निर्णयानुसार म्हाडाच्या मुंबई, पुणे, नाशिक, कोकण मंडळात एकापेक्षा अधिक इमारतींच्या पुनर्विकासास परवानगी देण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता वाटल्यास संबंधित प्रस्ताव राज्य सरकारने मंजुरीसाठी पाठवावा, असे नमूद केले आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06098 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..