एसटीच्या नाथजलला प्रवाशांची पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीच्या नाथजलला प्रवाशांची पसंती
एसटीच्या नाथजलला प्रवाशांची पसंती

एसटीच्या नाथजलला प्रवाशांची पसंती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : एसटीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेले नाथजल शुद्ध पेयजलची विक्री संपानंतर सुसाट सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये १८ लाख लिटर पेयजल बाटल्यांच्या विक्रीचे लक्ष्य असताना प्रत्यक्षात २४ लाख ९ हजार १२० लिटर पाण्याच्या बाटल्यांची विक्री होऊन ६,०९,१२० लिटर जादा विक्री झाली आहे. यातून महामंडळाला १६ लाख २१ हजार २८३ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

कोरोनाचा काळ आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीची प्रवासी सेवा ठप्प झाली होती. प्रवाशांची वाहतूकच होत नसल्याने प्रवाशांवर अवलंबून असलेले डेपोतील व्यावसायिक, दुकानदारसुद्धा आर्थिक संकटात सापडले होते. मात्र, आता गेल्या महिन्यातील २२ एप्रिलपर्यंत एसटी कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाल्याने एसटीची सेवा सुरू झाली असून, २३ लाखांपर्यंत प्रवासीसंख्या पोहचल्याने पुन्हा एकदा डेपोतील दुकानदारांच्या व्यवसायाला वेग आला आहे.

एसटीने सुरू केलेल्या नाथजल पेयजल बाटलीलासुद्धा प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद मिळत असून, ६५० मिली आणि एक लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये नाथजल डेपोमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये एसटीच्या डेपोमध्ये आता इतर ब्रँडच्या पाण्याची बाटली विकण्यास बंदी घालण्यात आली असून, एसटीच्या प्रवाशांना स्वच्छ पाणी अल्पदरात पुरवण्यात एसटी महामंडळ प्रशासन यशस्वी होताना दिसते आहे.

सवलतीच्या दरात एसटीच्या प्रवाशांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी देण्याचा उद्देशातून ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्याच उद्देशातून राज्यभरातील डेपो पातळीवर स्वस्त दरातच नाथजलची विक्री केली जात आहे.
- नीलेश शेळके, अध्यक्ष, नाथजल

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06099 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top