एसटीला पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीला पूर्वपदावर 
आणण्यासाठी प्रयत्न करा!
एसटीला पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करा!

एसटीला पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करा!

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : पाच महिन्यांच्या संपानंतर आता एसटीची राज्यभरातील सेवा पूर्वपदावर येत आहे. संपकाळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आदेश परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी विभाग नियंत्रकांना दिले. तसेच कामात कुचराई केल्यास कारवाई केली जाईल, असाही इशारा परब यांनी दिला.
परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांच्या उपस्थितीत एसटी मुख्यालयात विभाग नियंत्रकांची बैठक घेण्यात आली. यावेळी एसटीची सेवा पूर्वपदावर आणण्याबाबत आढावा घेण्यात आला. कोरोना आणि संपकाळात एसटी महामंडळाला दोन-अडीच वर्षे नुकसान सहन करावे लागले. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळ्याच्या सुटीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी योग्य वाहतुकीचे नियोजन करा, असेही आदेश परब यांनी विभाग नियंत्रकांना दिले. एसटीला भेडसावणाऱ्या समस्यांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळातील विविध विभागांचे महाव्यवस्थापक, तसेच वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
---
शालेय फेऱ्यांचे नियोजन करा
पुढील महिन्यापासून राज्यातील शाळा सुरू होतील. काही शाळांची वेळ बदललेली असेल. त्यामुळे एकाच मार्गावरील वेगवेगळ्या शाळांसाठी बदललेल्या वेळेनुसार अनेक गाड्या सोडल्या जातात. त्याऐवजी शाळांच्या वेळेचे नियोजन करून बस सोडाव्यात, अशी सूचनाही ॲड. परब यांनी केली.
--------

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06104 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top