गर्भापाताची औषधांची विक्री ‘मिशो’ला भोवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गर्भापाताची औषधांची 
विक्री ‘मिशो’ला भोवली
गर्भापाताची औषधांची विक्री ‘मिशो’ला भोवली

गर्भापाताची औषधांची विक्री ‘मिशो’ला भोवली

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : ऑनलाईन पोर्टलवर गर्भपाताच्या औषधांची नियमबाह्य विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने ‘मिशो’ या ऑनलाईन पोर्टलवर कारवाई केली. औषधांच्या विक्रीची पडताळणी करण्यासाठी राज्यभरातून ‘मिशो’वर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना गर्भपाताच्या औषधांची मागणी नोंदवण्यात आली होती.

‘मिशो’ या पोर्टलवरील ‘ब्यूटी आणि आरोग्य’ या सदराखाली सौदर्य प्रसाधने, वेलनेस प्रकारातील वस्तू दिसतात. पोर्टलच्या मुखपृष्ठावर कुठेही औषधांची माहिती मिळत नाही; सर्च विंडोमध्ये ‘एमटीपी’ या आद्य अक्षराने शोध घेतला असता एमटीपी अबोर्शन किट, एमटीपी किट टेबलेट एमटीपी पिल्स, एमटीपी टेबलेट आदी पर्याय उपलब्ध होत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ही औषधे मिळतात का, याबाबत राज्यातील विविध भागांतून मुंबई, ठाणे, कोल्हापूर, जळगाव, नागपूर येथून ‘मिशो’वर मागणी नोंदवण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे कुरियरमार्फत ही औषधे प्राप्त झाली. प्राप्त झालेली औषधे वाराणसी, आग्रा, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील पुरवठादाराकडून पाठवण्यात आल्याचे उघड झाले. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाकडून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० नुसार कारवाई करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06108 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top