
पादचारी पुलासाठी विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मध्य रेल्वे मुंबई विभाग कसारा स्थानकावर ६ मीटर पादचारी पूल बांधण्यासाठी तीन टप्प्यात गर्डर लाँच करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. आसनगाव ते कसारादरम्यान शनिवारी (ता. ७) दुपारी २.२५ ते ३.३५ वाजेपर्यंत अप मार्गावर ब्लॉक असेल. या वेळी उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येईल.
सीएसएमटी येथून सकाळी ११.४२ आणि दुपारी १२.३० वाजता कसाऱ्यासाठी सुटणारी लोकल आसनगाव येथे शॉर्ट टर्मिनेट होईल आणि आसनगाव - सीएसएमटी धीमी लोकल आसनगावहून दुपारी १.४८ आणि दुपारी २.५० वाजता निघेल. कसारा येथून दुपारी २.४२ आणि दुपारी ३.३५ वाजता सीएसएमटीकरिता सुटणारी लोकल रद्द राहील; तर आसनगाव ते कसारादरम्यानची उपनगरीय सेवा डाऊन दिशेला सकाळी ११.५५ ते दुपारी ३.१० पर्यंत आणि अप दिशेला दुपारी १.३० ते दुपारी ४.१५ पर्यंत बंद राहील. ब्लॉक दरम्यान, कसारा येथून सुटणाऱ्या आणि संपणाऱ्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून चालवण्यात येतील. अप मेल/एक्स्प्रेस गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून चालवण्यात येतील आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून चालवण्यात येतील.
ब्लॉक २ - शनिवार/रविवारी मध्यरात्री ३.३५ ते पहाटे ४.५५ पर्यंत आसनगाव आणि कसारादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
- उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक
- कसारा येथून पहाटे ४.५९ वाजता सुटणारी अप लोकल पहाटे ५.१५ वाजता सुटेल.
ब्लॉक ३ - रविवारी (ता. ८) सकाळी १०.५० ते दुपारी १२.२० वाजेपर्यंत डाऊन मार्गावर आणि दुपारी २.५० ते दुपारी ३.५० पर्यंत आसनगाव आणि कसारादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
- उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन
- सीएसएमटी येथून सकाळी ९.३४ आणि दुपारी १२.३० वाजता कसाऱ्यासाठी सुटणारी लोकल रद्द.
- कसारा येथून दुपारी १२.१९ आणि दुपारी ३.३५ वाजता सीएसएमटीकरिता सुटणारी लोकल कसारा ते ठाणे दरम्यान रद्द.
अप एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन
- गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२७४२ पाटणा - वास्को एक्स्प्रेस इगतपुरी स्टेशनवर नियमित केल्या जातील आणि वेळापत्रकापेक्षा ३५ ते ४० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
डाऊन एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन
- गाडी क्रमांक १२६१७ एर्नाकुलम -हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस खर्डी स्टेशनवर ३० ते ३५ मिनिटे नियमित केली जाईल.
- गाडी क्रमांक १२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जबलपूर गरीब रथ एक्स्प्रेस २५ ते ३० मिनिटे आटगाव स्थानकावर नियमित केली जाईल.
- गाडी क्रमांक ११०७१ लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस खडवली स्थानकावर १५ ते २० मिनिटे नियमित केली जाईल.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06109 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..