बंद कोळसा खाणींचे खासगीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंद कोळसा खाणींचे खासगीकरण
बंद कोळसा खाणींचे खासगीकरण

बंद कोळसा खाणींचे खासगीकरण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : कोळसा खाणकाम करणारी कंपनी कोल इंडिया लिमिटेड आपल्या २० बंद भूमिगत कोळसा खाणी खासगी क्षेत्राला देणार आहे. या प्रस्तावाबद्दल खासगी क्षेत्राला जागरूक करण्यासाठी शुक्रवारी (ता. 6) मुंबईत गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला.

भारतीय अर्थव्यवस्थेतील इंधनाची सतत वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी कोल इंडिया बंद भूमिगत कोळसा खाणी पुन्हा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. या खाणी सीआयएलच्या ईसीएल, बीसीसीएल, सीसीएल, सीईसीएल आणि डब्लूसीएल या पाच उपकंपन्यांमध्ये पसरलेल्या आहेत. या खाणींबाब कंपन्यांना माहिती देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या गुंतवणूकदारांचे मेळाव्याला भेल, हिंडाल्को, अदानी, जेएसपीएल, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्स्लटिंग इंजिनियर्स लिमिटेड, अल्ट्रा टेक सिमेंट, वेदांता यासारखे प्रमुख भागधारक आणि इतर आघाडीचे उद्योगपती उपस्थित होते.

कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी या वेळी म्हणाले की, आधुनिक जीवनशैलीमुळे विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे आम्ही उर्जेचे नवीकरणीय स्रोत विकसित करण्यावर भर देत असून कोळसा ऊर्जा उत्पादनातील एक प्रमुख योगदान देणारा ठरणार आहे. या बंद खाणींवर काम केले गेले आहे, याकडे त्यांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.

उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट!
भारताकडे कोळशाचा जगातील पाचव्या क्रमांकाचा साठा आहे, असे कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यावेळी म्हणाले. आर्थिक वर्ष २३-२४ पर्यंत देशांतर्गत कोळसा उत्पादन १.२ अब्ज मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ''इंधन म्हणून, कोळशाचा ऊर्जा मिश्रणात सर्वात मोठा वाटा आहे'' असे ते म्हणाले. यावेळी कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल आणि अतिरिक्त सचिव (कोळसा) एम. नागराजू उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06112 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top