बेळगाव मराठी साहित्य संमेलनास नाना पटोले विशेष अतिथी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव मराठी साहित्य संमेलनास नाना पटोले विशेष अतिथी
बेळगाव मराठी साहित्य संमेलनास नाना पटोले विशेष अतिथी

बेळगाव मराठी साहित्य संमेलनास नाना पटोले विशेष अतिथी

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ मे रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणाऱ्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास काँग्रेस नेते नाना पटोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सीमाभागात मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषिवणार असून विशेष अतिथी म्हणून काँग्रेस नेते नाना पटोले व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, काँग्रेस महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाला मोठ्या संख्येने साहित्यिक व रसिक उपस्थित राहणार आहेत. साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील व जिल्हा अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण हे संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06113 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top