मध्य, हार्बरवर आज मेगाब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

megablock central and harbour line
मध्य, हार्बरवर आज मेगाब्लॉक

मध्य, हार्बरवर आज मेगाब्लॉक

मुंबई : मध्य, हार्बर रेल्वेवरील रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल- दुरुस्तीसाठी रविवारी (ता. ८) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वसई ते वैतरणा अप-डाऊन जलद मार्गावर सोमवार-मंगळवार रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग
कधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथून धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे सर्व लोकल नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाण्यापूर्वी जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे
कुठे : सीएसएमटी- चुनाभट्टी/वांद्रे
कधी : सकाळी ११.१० ते ४.४० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी/ वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. ब्लॉककाळात पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे
कुठे : वसई ते वैतरणा अप जलद मार्गावर
कधी : पश्चिम रेल्वेमार्गावर सोमवारी रात्री ११.५० ते पहाटे २.५० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. याशिवाय डाऊन जलद मार्गावर मंगळवारी पहाटे १.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
परिणाम : या ब्लॉक कालावधीत ट्रेन क्रमांक ०९१०१ विरार-भरुच मेमु आपल्या निर्धारित वेळेत म्हणजे ४.३५ ऐवजी ४.५० वाजता सुटणार आहे. दरम्यान, आज पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक नसेल.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06117 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top