नीट पीजी परीक्षा मे मध्येच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीट पीजी परीक्षा मे मध्येच
नीट पीजी परीक्षा मे मध्येच

नीट पीजी परीक्षा मे मध्येच

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘नीट’ म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट फॉर पोस्टग्रॅजुएट २०२२ ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. त्यात तुर्तास कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नये. नीट पीजी २०२२ ही परीक्षा २१ मे रोजी होणार असून नियोजित वेळापत्रकात कोणताच बदल करण्यात आलेला नाही, असे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने (एनबीईएमएस) सांगितले आहे.

नीट पीजी २०२२ ही परीक्षा स्थगित करण्यासाठी मागील काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात होती. त्यातच आता सोशल मीडियावर ही परीक्षा ९ जुलैपर्यंत स्थगित झाली असल्याचे एक बनावट परिपत्रक व्हायरल झाले आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याची एनबीईएमएसने गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना हेल्पलाईन क्रमांक - ०११-४५५९३००० ही हेल्पलाईन जारी केली असून अधिकची माहिती एनबीईएमएसच्या https://natboard.edu.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
--
पत्रकावर क्यूआर कोड
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी एनबीईएमएसच्या वेबसाईटवरून प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक पत्रकावर एक क्यूआर कोड देण्यात आला आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करून विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या सर्व परिपत्रकांची सत्यता पडताळून पाहावे, असेही एनबीईएमएसने म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06121 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top