दिवसभरात २५३ नवीन कोरोनाबाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवसभरात २५३ नवीन कोरोनाबाधित
दिवसभरात २५३ नवीन कोरोनाबाधित

दिवसभरात २५३ नवीन कोरोनाबाधित

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : राज्यात शनिवारी (ता. ७) २५३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७९०५४ झाली आहे. आज १३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२९,९३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे. दरम्यान, राज्यात आज एकूण १२७७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस सक्रिय रुग्णही वाढत असून राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात शुक्रवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्युदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०३,५५,०७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७९,०५४ (९.८४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06127 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top