धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करा
धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करा

धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : गेल्या सतरा वर्षांपासून धारावी पुनर्विकास प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी सरकार गंभीर नसल्याने हा प्रकल्प रद्द करावा. तसेच नागरिकांना स्वयंविकासाची परवानगी द्यावी, अशी मागणी धारावीकरांनी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडे केली आहे.

धारावीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने २००४ मध्ये घेतला. यासाठी धारावी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना केली. आजवर प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाल्यानंतरही प्रकल्पाचे काम सुरू होत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांबाबत धारावीकरांनी आपल्या व्यथा पालकमंत्र्यांकडे मांडल्या. मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दरबारात धारावीकरांनी आपल्या समस्या मांडल्या. धारावी पुनर्विकासाबाबत सरकार गंभीर नसल्याने आणि हा प्रकल्प राबवणे अशक्य असल्याने सरकारने तो रद्द करावा, अशी मागणी जनकल्याण गृहनिर्माण विकास समितीचे सरचिटणीस अनिल कासारे यांनी केली. यावर पालकमंत्र्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन रहिवाशांना दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06130 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top