सांताक्रूझच्या एलआयसी कार्यालयाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांताक्रूझच्या एलआयसी कार्यालयाला आग
सांताक्रूझच्या एलआयसी कार्यालयाला आग

सांताक्रूझच्या एलआयसी कार्यालयाला आग

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : सांताक्रूझ येथील आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयाला शनिवारी (ता. ७) सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार्यालयातील अनेक महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले.
सांताक्रूझच्या एसव्ही मार्गावरील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) इमारतीला सकाळी ६.४० च्या सुमारास आग लागली. याच इमारतीत एलआयसीचे वेतन बचत योजना (एसएसएस) विभागीय कार्यालय आहे. मुंबई अग्निदशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून सहा तासांत आग आटोक्यात आणून कूलिंग ऑपरेशन्स सुरू केले. घटनास्थळापासून जवळच एलआयसीचे डेटा सेंटर होते; मात्र ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले, असे एलआयसीने म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06132 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top