बीडीडी चाळीतील घरे विक्रीसाठी सल्लागार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीडीडी चाळीतील घरे विक्रीसाठी सल्लागार
बीडीडी चाळीतील घरे विक्रीसाठी सल्लागार

बीडीडी चाळीतील घरे विक्रीसाठी सल्लागार

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. रहिवाशांच्या पुनर्वसनानंतर शिल्लक राहणाऱ्या जागेवर म्हाडा विक्री घटकासाठी घरे उभारणार आहे. तिन्ही ठिकाणच्या विक्री घटकाच्या घरांच्या विक्रीचे धोरण निश्चित करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने रिअल इस्टेट सल्लागाराची नेमूणक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पात्र सल्लागारांकडून म्हाडाने निविदा मागवल्या आहेत.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारने म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून निवड केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून म्हाडाने नायगाव येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम एल अँड टी कंपनीला दिले आहे. ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या कामासाठी शापूरजी अँड पालनजी; तर वरळी बीबीडीचे काम टाटा कंपनीला दिले आहे. तिन्ही ठिकाणी रहिवाशांच्या पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. पुढील दोनतीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. पुनर्वसन इमारतीसह तिन्ही प्रकल्पाच्या ठिकाणी विक्री घटकाच्या घरांचे कामही करण्यात येणार आहे.

प्रकल्पासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी म्हाडा विक्री घटकातील घरांची विक्री करून त्यामधून महसूल जमा करण्याचा विचार केला जात आहे. त्यानुसार म्हाडाने विक्री घटकांचे धोरण बनवण्यासाठी रिअल इस्टेट सल्ल्गाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग येथील घरे कशा पद्धतीने विक्री करायची याबाबत सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी मंडळाने निविदा मागवल्या असून पात्र कंपन्यांना ३० मेपर्यंत निविदा भरता येणार आहेत. याबाबत मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06133 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top