सोमय्या यांच्या पत्नीची राऊतांविरोधात अब्रूनुकसानीची तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमय्या यांच्या पत्नीची 
राऊतांविरोधात अब्रूनुकसानीची तक्रार
सोमय्या यांच्या पत्नीची राऊतांविरोधात अब्रूनुकसानीची तक्रार

सोमय्या यांच्या पत्नीची राऊतांविरोधात अब्रूनुकसानीची तक्रार

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी सोमवारी (ता. ९) मुलुंड पोलिस ठाण्यात अब्रूनुकसानीची तक्रार दाखल केली. संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्यासह त्यांची पत्नी मेधा सोमय्या आणि पुत्र नील सोमय्या मुलुंड पोलिस ठाण्यात गेले होते.

सोमय्या कुटुंबीयांनी मुलुंडच्या नवघर पोलिस ठाण्यात जाऊन संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. भादंवि ५०३, ५०६ आणि ५०९ अंतर्गत पोलिसांनी एफआयआर नोंदवला. मेधा सोमय्या या मागील ३५ वर्षे शिक्षण क्षेत्रात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांच्याद्वारे सोमय्या कुटुंबीयांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले. मुंबई पोलिसांनी नौटंकी बंद करावी, असे आव्हान सोमय्यांनी मुंबई पोलिसांना दिले आहे. संजय पांडे यांनीही ज्या पोलिस ठाण्यात एफआयआर नोंद करणार नाहीत, त्या पोलिस अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करणार असल्याचे म्हटले होते.
त्यामुळे पांडे यांनी हा एफआयआर दाखल करण्याचे पोलिसांना आदेश द्यावेत, असे सोमय्या म्हणाले. मुलुंड पोलिसांनी सात दिवसांत याप्रकरणी कारवाई न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही सोमय्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06161 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top