''असानी''चा मुंबईवर परिणाम नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''असानी''चा मुंबईवर परिणाम नाही
''असानी''चा मुंबईवर परिणाम नाही

''असानी''चा मुंबईवर परिणाम नाही

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : पश्‍चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा मुंबईवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केले; तर राज्यातील काही भागांत आलेल्या उष्णतेच्या लाटेचाही मुंबईवर काहीही परिणाम झाला नसल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
पश्‍चिम बंगालच्या उपसागरात ‘असानी’ चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम मध्य आणि लगतच्या दक्षिण बंगालच्या उपसागरावर ‘असानी’ तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले असून ते सहा तासांत २५ कि.मी. प्रतितास वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले आहे. १० मे पर्यंत वायव्येकडे सरकून उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनाऱ्यापासून पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. पुढे हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यापासून वायव्य बंगालच्या उपसागराकडे जाण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ मुंबई समुद्र किनाऱ्यापासून बरेच दूर आहे. चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने सरकण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे त्याचा प्रभाव जाणवण्याची चिन्हे कमी असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले. ‘असानी’ चक्रीवादळ हे जमिनीपासून लांब खोल समुद्रात निर्माण झाले आहे, त्याची दिशा ही ओडिशाच्या दिशेने असल्याचे त्या म्हणाल्या.

उष्णतेमुळे हवेत आर्द्रता
गेल्या आठवडाभरापासून मुंबईतील कमाल तापमान स्थिर आहे. सोमवारी कुलाबा ३३.५ सांताक्रूझ ३५.१ अंश तापमानाची नोंद झाली. पुढील पाच दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. सध्या समुद्राकडून वाहणारे वारे उष्ण आहेत. त्यामुळे हवेत आर्द्रता जाणवत आहे, असेही नायर पुढे म्हणाल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06162 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top