मुंबईतील कोरोना रुग्णात किंचित घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील कोरोना रुग्णात किंचित घट
मुंबईतील कोरोना रुग्णात किंचित घट

मुंबईतील कोरोना रुग्णात किंचित घट

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णांमध्ये सोमवारी किंचित घट नोंदवण्यात आली आहे. दिवसभरात ६३ नवे कोरोना रुग्ण आढळले. आता मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १०,६०,७९२ झाली आहे. एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५६३ एवढ्यावर स्थिर आहे.
सध्या शहर उपनगरात ८२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण १,०४०,४०७ बाधितांनी कोरोनाला हरवले आहे. दिवसभरात निदान झालेल्या रुग्णांपैकी ६१ लक्षणविरहित असून दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६३४७ दिवसांवर येऊन ठेपला आहे. ६ ते १४ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.००७ टक्क्यांवर आहे. पालिकेने गेल्या २४ तासांत रुग्णांच्या संपर्कातील एकूण ५७५ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. मुंबईत एकूण १,०६०,७९२ कोरोना बाधित असून मृतांची संख्या १९ हजार ५६३ इतकी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06166 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top