हार्बर मार्गावरील एसी लोकलला ब्रेक? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हार्बर मार्गावरील एसी लोकलला ब्रेक?
हार्बर मार्गावरील एसी लोकलला ब्रेक?

हार्बर मार्गावरील एसी लोकलला ब्रेक?

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : हार्बर मार्गावरून एसी लोकलची सेवा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे हार्बर मार्गावरील एसी सेवा रद्द करण्याचे नियोजन मध्य रेल्वेने सुरू केले आहे. हार्बरवरील एसी लोकल आता मध्य रेल्वेमार्गावर चालवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची चिन्हे आहेत.

सध्या हार्बर मार्गावर एसी लोकलच्या १६ फेऱ्या धावत आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर ४४ फेऱ्या होत आहेत. सीएसएमटी ते कल्याण मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे. ५ मेपासून एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात करण्यात आल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिणामी एसी लोकलचा एक रेक आता हार्बरऐवजी मुख्य मार्गावर चालवण्याचे नियोजन सुरू आहे.

जानेवारी २०२२ पासून सीएसएमटी आणि गोरेगाव/वांद्रे आणि वाशी/पनवेल स्थानकांदरम्यान १६ एसी लोकल सेवा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, हार्बर मार्गावरील एसी लोकलना प्रतिसाद मिळत नसल्याने त्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर चालवण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. ५ मेपासून एसी लोकलचे तिकीट दर ५० टक्क्यांनी कमी झाल्याने प्रवाशांची संख्या वाढत गेली.

मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या चार एसी लोकल आहेत. तीन गाड्या मुख्य मार्गिकेवर धावतात. एक गाडी हार्बर मार्गावर धावत आहे. मात्र, आता चारही लोकल मुख्य मार्गिकेवर चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे रविवारच्या पीक अवरमध्ये एसी लोकलची फेरी धावण्याची शक्यता आहे.

एसी लोकलला मिळत असलेला प्रतिसाद
तारीख सीएसएमटी ते कल्याण/टिटवाळा/बदलापूर सीएसएमटी ते पनवेल सीएसएमटी ते गोरेगाव
२ मे २९७९ प्रवासी १०३ प्रवासी २११ प्रवासी
४ मे २८२२ प्रवासी ८३ प्रवासी १९७ प्रवासी
५ मे ४८५२ प्रवासी १६५ प्रवासी ३१९ प्रवासी
६ मे ५७५१ प्रवासी २२० प्रवासी ३७५ प्रवासी
७ मे ५७८० प्रवासी १८२ प्रवासी ३३० प्रवासी

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06167 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top