संदीप देशपांडेंसह दोघांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संदीप देशपांडेंसह दोघांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
संदीप देशपांडेंसह दोघांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

संदीप देशपांडेंसह दोघांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह दोघांनी आज मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. मंगळवारी त्यावर तातडीने सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. मात्र, देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेत असताना झालेल्या गोंधळात एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला धक्का लागून ती जमिनीवर कोसळली होती. त्यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी दोघांविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला असून त्यांचा तपास सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06169 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top