कालबाह्य ईटीआयमशीनचा एसटीत वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कालबाह्य ईटीआयमशीनचा एसटीत वापर
कालबाह्य ईटीआयमशीनचा एसटीत वापर

कालबाह्य ईटीआयमशीनचा एसटीत वापर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : एसटीच्या ताफ्यात ईटीआय मशीन पुरवण्याची जबाबदारी ट्रायमॅक्स कंपनीची असून, या कंपनीला पाच वर्षांसाठीच या मशीन पुरवण्याचे आणि देखभाल दुरुस्तीचे काम देण्यात आले होते; तर तेवढ्याच कालावधीची मशीनचीही कालमर्यादा होती. मात्र आता ७ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटूनही ईटीआय मशीन पुरवणे आणि देखभाल दुरुस्तीचे नवीन कंत्राट रखडल्याने कालबाह्य मशीनच्या भरवशावर एसटीची प्रवासी वाहतूक सुरू असून, एप्रिल महिन्यात राज्यभरात ५४ टक्के मशीन नादुरुस्त आणि बंद होऊनही एसटीच्या अधिकाऱ्यांकडून त्यासंदर्भात कोणत्याही उपाययोजना करताना दिसून येत नाही.
एसटीच्या नवख्या वाहकांच्या हाती ईटीआय मशीनऐवजी जुन्या तिकिटांचा ट्रे देण्यात देण्यात आला आहे. मात्र तिकीट देणे आणि त्याचा हिशेब मांडून ठेवण्याची सवय आता कर्मचाऱ्यांना नाही. शिवाय जुन्या तिकिटांचे प्रिंटिंगसुद्धा बंद असल्याने एसटीच्या तिकीट यंत्रणेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी ईटीआय मशीन कंत्राटासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या आरोपामुळे नवीन निविदा प्रक्रिया थांबली गेली. मात्र आता लोकायुक्तांनी याप्रकरणी तथ्य नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर नवीन निविदा प्रक्रियेला गती आली आहे.
अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता
गेल्या ७ वर्षांपेक्षा जास्त काळ ट्रायमॅक्स कंपनी एसटीची ईटीआय मशीन पुरवणे आणि देखभाल दुरुस्तीचे काम करत आहे. मात्र याचदरम्यान ट्रायमॅक्स कंपनी आता दिवाळखोरीत निघाली आहे. त्यामुळे त्यांना नवीन निविदा प्रक्रियेत सहभागी होता येत नसल्याने दुसऱ्या कंपनीचे नाव पुढे करून ट्रायमॅक्स कंपनीच नव्याने एसटीचे ईटीआय मशीन पुरवण्याचे काम घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले असून नवीन निविदा प्रक्रियेत चार कंपन्यांनी निविदा भरल्या आहे. त्यामध्ये एमनेक्स, ओरियनप्रो, हिताची आणि इबिक्स कंपनीचा समावेश आहे. मात्र आता नव्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण करून, संचालक मंडळाची मान्यता आणि अंमलबजावणी आणि नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे, नवीन सॉफ्ट वेअर, मशीन पुरवण्याचा अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
------
ईटीआय मशीन बंद असल्याने जुन्या तिकिटांचे ट्रे वाहकांना दिले जात आहेत. शिवाय मशीनची दुरुस्तीसुद्धा केली जात आहे. त्यामुळे तिकिटांचा तुटवडा नाही.
- यामिनी जोशी, उपमहाव्यवस्थापक, वाहतूक
-----

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06170 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top