अनिल देशमुख यांच्या अर्जावर शुक्रवारी निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल देशमुख यांच्या
अर्जावर शुक्रवारी निर्णय
अनिल देशमुख यांच्या अर्जावर शुक्रवारी निर्णय

अनिल देशमुख यांच्या अर्जावर शुक्रवारी निर्णय

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : मनी लॉण्डरिंगच्या आरोपात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर मुंबई विशेष न्यायालयात शुक्रवारी (ता. १३) निर्णय होणार आहे.
देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात अटक केली होती. आतापर्यंत त्यांनी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात दोन वेळा जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. आता वैद्यकीय कारणांमुळे देशमुख यांनी जामीन मिळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. ७१ वर्षीय देशमुख यांच्या खांद्यावर उपचारांची आवश्यकता आहे, तसेच त्यांना वयोमानानुसार विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्याची आवश्यकता अर्जात नमूद केले आहे.
दरम्यान, ‘ईडी’ने या अर्जाला विरोध केला आहे. या प्रकरणात महत्त्वाचा तपास सुरू आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार होऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात ईडीतर्फे करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06176 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top