मेट्रो प्रकल्पातील झाडांच्या संरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो प्रकल्पातील झाडांच्या 
संरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा!
मेट्रो प्रकल्पातील झाडांच्या संरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा!

मेट्रो प्रकल्पातील झाडांच्या संरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा!

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : मुंबईतील मेट्रो-७ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवी झाडे लावणे; तसेच काही झाडांच्या पुनर्लागवडीदरम्यान झाडांचे संरक्षण करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली. याबाबत राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएला भूमिका स्पष्ट करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर दहिसर ते अंधेरीदरम्यान १६ किमीचा मेट्रो ७ प्रकल्प आहे. या प्रकल्प उभारताना झाडांची पुनर्लागवड पर्यावरण संरक्षण नियमानुसार करण्यात आली नाही, असा आरोप शिवतेज फाऊंडेशनचे वतीने सुमीत धुरी यांनी जनहित याचिकेतून केला. ज्या ठिकाणी झाडांची पुनर्लागवड किंवा नव्याने लागवड करण्यात येणार होती, तिथे कोणतीही विशेष कार्यवाही झालेली नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला. याबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेला तपशील याचिकेत दाखल करण्यात आला. न्यायालयात सदर याचिकेवर ११ जुलैला सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06178 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top