मुंबई विद्यापीठाखडून उस्ताद झाकीर हुसेन पदवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठाखडून उस्ताद झाकीर हुसेन पदवी
मुंबई विद्यापीठाखडून उस्ताद झाकीर हुसेन पदवी

मुंबई विद्यापीठाखडून उस्ताद झाकीर हुसेन पदवी

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : मुंबई विद्यापीठाच्या वतीने जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी ) व प्रसिद्ध उद्योजक शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. ही मानद पदवी गुरुवारी (ता. १२)विशेष दीक्षान्त समारंभात प्रदान केली जाणार आहे.
राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित राहणार आहेत.
हा पदवीदान सोहळा सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या फोर्ट येथे सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने या वर्षी झाकीर हुसेन, तसेच गरवारे उद्योजक समूहाचे प्रमुख शशिकांत गरवारे यांना त्यांच्या कार्यातील योगदानाबद्दल मानद पदवी देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी विद्यापीठाने प्रसिद्ध कृषितज्ज्ञ स्वामिनाथन यांना डी. लिट ही मानद पदवी देण्यात आली होती.
...
विविध सन्मान
उस्ताद झाकीर हुसेन हे भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक आहेत. हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांचे सर्वांत मोठे पुत्र आहेत. त्यांना १९८८ साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06187 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top