म्हाडा सोडतीतील विजेत्यांना किंमतवाढीचा धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडा सोडतीतील 
विजेत्यांना किंमतवाढीचा धक्का
म्हाडा सोडतीतील विजेत्यांना किंमतवाढीचा धक्का

म्हाडा सोडतीतील विजेत्यांना किंमतवाढीचा धक्का

sakal_logo
By

तेजस वाघमारे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत गतवर्षी ८ हजार ९८४ घरांची सोडत काढण्यात आली होती. या सोडतीमध्ये २० टक्के योजनेत यशस्वी झालेल्या पात्र विजेत्यांकडून खाजगी विकसक लूट करत असल्याच्या तक्रारी म्हाडाकडे येत आहेत. सर्वसाधारण शुल्काच्या नावाखाली विकसक विजेत्यांकडून पाच लाखाहून अधिक अतिरिक्त रक्कम वसूल करत असल्याचा आरोप विजेत्यांनी केला आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाने पंतप्रधान आवास योजना, म्हाडा योजना, खाजगी विकसकांकडून म्हाडाला प्राप्त झालेली २० टक्के योजनेतील घरांचा समावेश होता. ठाणे, नवी मुंबई परिसरातील घरे बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतींमध्ये असल्याने या सोडतीला अर्जदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. या सोडतीसाठी दोन लाख ४६ हजार ६५० विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते.
मंडळाने २० टक्के योजनेतील विजेत्यांची पात्रता निश्चित केली असून त्यानुसार विजेत्यांना विकसकाकडे रक्कम भरण्यास कळवले. त्याप्रमाणे विजेते विकसकांकडे पैसे भरण्यासाठी जात आहेत, मात्र खाजगी विकसक म्हाडाने निश्चित केलेल्या किंमती व्यतिरिक्त इतर शुल्क आकारणी करत आहेत. म्हाडाने जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सदनिका रक्कमेव्यतिरिक्त जीएसटी, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, मालमत्ता कर, वीजजोडणी शुल्क, सोसायटी नोंदणी शुल्क, सोसायटीच्या नावे जमीन हस्तांतरण शुल्क, इत्यादी शासकीय महापालिकाकडील शुल्काचा भरणा तसेच रेरा कायद्याअंतर्गत असलेल्या इतर बाबींचे शुल्क आणि पार्किंग हवी असल्यास त्याचे शुल्क विजेत्यांना भरावा लागणार आहे, मात्र खाजगी विकसक विजेत्यांकडून सदनिका रक्कमेव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क वसूल करत आहेत. त्यामुळे विजेत्यांना जाहिरातीतील शुल्कापेक्षा आठ ते दहा लाखांचा अतिरिक्त भुर्दंड भरावा लागणार आहे.
---
विकसकांकडून पजेशन चार्जेस आणि मेटेनन्स चार्जेसच्या नावाखाली अतिरिक्त रक्कमेची मागणी होऊ लागल्याने विजेत्यांनी म्हाडाकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत कार्यकारी अभियंता कोकण मंडळ यांनी विकासकांना जाहिरारीमध्ये नमूद केलेल्या शुल्काशिवाय इतर कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारण्याचे पत्र दिले आहे.
..............
याबाबत सविस्तर माहिती घेऊन उचित कारवाई करण्यात येईल. विजेत्यांनी तक्रारी केल्या असल्यास त्यांची दखल घेऊन त्यांना न्याय देण्यात येईल.
- शिवकुमार आडे, प्रभारी मुख्य अधिकारी, कोकण मंडळ, म्हाडा.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06191 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top