देशपांडेंच्या वाहनचालकाचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशपांडेंच्या वाहनचालकाचा 
जामिनासाठी न्यायालयात अर्ज
देशपांडेंच्या वाहनचालकाचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज

देशपांडेंच्या वाहनचालकाचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : मशिदींवरील भोंग्यांप्रकरणी गुन्हा दाखल झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्या वाहनचालकाने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. देशपांडे यांचा चालक राहुल वैश्य आणि संतोष साळी यांना शिवाजी पार्क पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि तणाव निर्माण करणे आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत पलायन केले, तेव्हा वैश्य यांनी वेगाने गाडी चालवली होती. यावेळी एक महिला पोलिस जखमी होऊन जमिनीवर कोसळल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या वैश्य न्यायालयीन कोठडीत आहेत. बुधवारी त्यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. देशपांडे आणि धुरी यांनीदेखील मंगळवारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर १७ मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06194 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top