जमीन गैरव्यवहारप्रकरणी आमदार गोरे यांना दिलासा नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमीन गैरव्यवहारप्रकरणी
आमदार गोरे यांना दिलासा नाही
जमीन गैरव्यवहारप्रकरणी आमदार गोरे यांना दिलासा नाही

जमीन गैरव्यवहारप्रकरणी आमदार गोरे यांना दिलासा नाही

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीचा व्यवहार केल्याप्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरे यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. अटकपूर्व जामिनासाठी गोरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिल्याने गोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
माण-खटावचे आमदार असलेले जयकुमार गोरे हे भाजपचे सातारा जिल्हाध्यक्षदेखील आहेत. मायणी येथील जमिनीच्या वादात त्यांच्यासह पाच जणांविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर जमीन व्यवहारासाठी त्यांनी मायणी येथील मृत रहिवासी भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला होता. या प्रकरणी जयकुमार गोरे यांच्यासह दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) आणि अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फिर्याद महादेव पिराजी भिसे यांनी केली आहे. या पूर्वी संजय काटकर यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
---
वडूज न्यायालयाकडूनही दणका
गोरे यांनी यापूर्वी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी वडूज न्यायालयात अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली. न्या. अनिल मेनन आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने आज सुनावणीला नकार दिला. पुढील सुनावणी १७ मे रोजी निश्चित केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06195 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top