मध्य रेल्वेवरून सर्वाधिक उन्हाळी विशेष गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेवरून सर्वाधिक उन्हाळी विशेष गाड्या
मध्य रेल्वेवरून सर्वाधिक उन्हाळी विशेष गाड्या

मध्य रेल्वेवरून सर्वाधिक उन्हाळी विशेष गाड्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभागण्यासाठी आणि आरामदायी प्रवासासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जातात. यंदाच्या वर्षातही मध्य रेल्वेने सर्वाधिक ६२६ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. तसेच या वर्षीच्या उन्हाळ्यात इतर रेल्वे विभागांतून सुरू होणाऱ्या गाड्यांसह एकूण ६९० विशेष गाड्यांची घोषणा झाली.
विशेषतः उन्हाळ्यातील हंगामात प्रवाशांची सतत वाढती मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने या वर्षी नियमित गाड्यांव्यतिरिक्त ६२६ उन्हाळी विशेष रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली आहे. उन्हाळ्यातील विशेष ट्रेनची संख्या २०२१ या वर्षात ४३५ आणि २०१९ मध्ये ५४० होती; तर २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे उन्हाळ्यात विशेष ट्रेन चालवण्यात आल्या नाहीत.
एप्रिल ते जून २०२२ मध्ये या ६२६ उन्हाळी विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे, नागपूर, साईनगर शिर्डीसारख्या मध्य रेल्वेतील स्थानकांपासून विविध इच्छित स्थानकांपर्यंत चालवण्यात येत आहेत. इतर रेल्वेतून सुरू होणाऱ्या गाड्यांसह एकूण ६९० विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. एलटीटी ते शालिमार, बलिया, गोरखपूर, मऊ, समस्तीपूर, बनारस तसेच थिविदरम्यान ३०६ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यांपैकी काही गाड्या धावत आहेत. यात दोन शिक्षक विशेषदेखील आहेत. सीएसएमटी ते मनमाड, नागपूर, मालदा टाऊन तसेच रिवादरम्यान २१८ विशेष गाड्या, पुणे आणि करमळी, जयपूर दानापूर, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन तसेच कानपूर सेंट्रल दरम्यान १०० विशेष गाड्या, नागपूर आणि मडगावदरम्यान २० विशेष गाड्या साईनगर शिर्डी ते ढहर का बालाजीदरम्यान २० विशेष गाड्या, पनवेल ते करमळीदरम्यान १८ विशेष गाड्या, दादर ते मडगावदरम्यान सहा विशेष गाड्या, लातूर ते बिदरदरम्यान दोन विशेष गाड्यांची घोषणा केली आहे; तर यांपैकी काही गाड्या धावत आहेत व काही गाड्यांच्या फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.
...
द्वितीय श्रेणीचे जास्त डबे...
विशेषत: उत्तरेकडील आणि पूर्वकडील रेल्वेकरिता प्रचंड मागणी लक्षात घेता सामान्य द्वितीय श्रेणीचे जास्तीत जास्त डबे विविध उन्हाळी विशेष गाड्यांना संलग्न केले जात आहेत. आधीच संलग्न असलेल्या सामान्य द्वितीय श्रेणीच्या डब्यांव्यतिरिक्त मध्य रेल्वेने बलिया आणि गोरखपूर उन्हाळी विशेष ट्रेनला दोन सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे वाढवण्याची घोषणा केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06196 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top