अवैध प्रवासी वाहतूक जोमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध प्रवासी वाहतूक जोमात
अवैध प्रवासी वाहतूक जोमात

अवैध प्रवासी वाहतूक जोमात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : वाहन परवाना नसतानाही खासगी बसेस, कारमधून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर राज्यभरात परिवहन विभागाकडून कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षभरात १ लाख १७ हजार ६६४ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये २० हजार १७९ वाहने दोषी आढळली; तर १,२१४ वाहनांची नोंदणी निलंबित केली गेली. यामध्ये ठाणे, कोल्हापूर, पुणे, धुळे विभागात सर्वाधिक दोषी वाहनांवर कारवाई झाली आहे.

राज्यभरातील आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांच्या नेतृत्वात भरारी पथकांची नियुक्ती केली जाते. त्यामध्ये सुमारे ३ जणांचे पथक असते; तर कर्मचारी आणि वाहनांच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक आरटीओ कार्यालयांमध्ये पथकांची संख्या ठरली जाते. त्याप्रमाणे राज्यभरातील आरटीओ आणि एआरटीओ कार्यालयाच्या अंतर्गत अवैध प्रवासी वाहून नेणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

कारवाईमध्ये अनेक वाहनधारकांकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना नसल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर हे वाहतूकदार मोठ्या संख्येने अवैध प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळले. त्याशिवाय खासगी वाहन, खासगी बसेसमधून सर्रास टप्पा वाहतुकीच्या पद्धतीने अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही सर्वाधिक खासगी वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतूक होते. शिवाय, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, अमरावती अहमदनगर, नांदेड यासह अनेक भागांमध्ये सर्वाधिक अवैध प्रवासी वाहतूक सुरूच आहे.
------------
अवैध प्रवासी वाहतुकीची कारवाई
विभाग - तपासलेली वाहन - दोषी वाहन- अडवून ठेवलेली वाहन - परवाना निलंबन - नोंदणी निलंबन
मुंबई - ६८२२ - ९१३ - ३७ - १७७ - ५७
ठाणे - ३७२९९ - ४३७९ - १८२- १२६ - ७१
पनवेल - ८४८४ - ७९० - २७ - २ - १५४
कोल्हापूर - ८८०१ - २३३८ - १५६ - ६८ - ७४
पुणे - ११२७४ - २६७८ - ६५५ - ० - १६
नाशिक - ६५७८ - ७७५ - ९९ - ११ - ७५
धुळे - १४०८३ - २४७७ - ३५९ - २२ - ३२९
औरंगाबाद - ३९३५ - ८५६ - ९१ - २५ - २७
नांदेड - ७४५२ - १३२२ - १७५ - २ - २१३
लातूर - ३९४८ - ८८६ - ९५ - ० - ४६
अमरावती - ५८६९ - १८५२ - १७० - ४१ - ९०
नागपूर शहर - ११२३ - ३०६ - २ - १२ - २५
नागपूर ग्रामीण - २५४६ - ६०७ - १२६ - ९ - ३७

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06197 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top