शास्त्रोक्त वृक्ष छाटणीसंदर्भात प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शास्त्रोक्त वृक्ष छाटणीसंदर्भात प्रशिक्षण
शास्त्रोक्त वृक्ष छाटणीसंदर्भात प्रशिक्षण

शास्त्रोक्त वृक्ष छाटणीसंदर्भात प्रशिक्षण

मुंबई : पावसाळ्यात वृक्ष छाटणी करताना पक्ष्यांच्या घरट्यांची कशी काळजी घ्यावी, वृक्षांची योग्यप्रकारे जोपासना कशी करावी आणि आवश्यकतेनुसार शास्त्रोक्त पद्धतीने वृक्ष छाटणी कशी करावी, आदी पैलूंसंदर्भात महापालिकेच्या उद्यान अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय वृक्षतज्ज्ञ परिषदेमार्फत प्रमाणित वृक्षतज्ज्ञांकडून बुधवारी (ता. ११) प्रशिक्षण देण्यात आले.
मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी, तसेच कंत्राटदारांकडे असलेले उद्यानविषयक तज्ज्ञ व त्यासोबत मुंबईतील ज्या आस्थापनांकडे उद्यानविषयक तज्ज्ञ आहेत, अशा मुंबईतील बहुतांश उद्यान विषयाशी निगडित अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले.

महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आयोजित या उपक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय वृक्षतज्ज्ञ परिषदेमार्फत प्रमाणित वृक्षतज्ज्ञ वैभव राजे व इतर तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले. पावसाळ्यात करण्यात येणारी वृक्षांची छाटणी/कापणी या विषयी मार्गदर्शनपर सत्रासह प्रात्यक्षिकदेखील यामध्ये समाविष्ट होते. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, उद्यान विभागाचे सर्व अधिकारी, वृक्ष छाटणी पर्यवेक्षक आणि खासगी संस्थांमधील उद्यान तज्ज्ञ याप्रसंगी उपस्थित होते.

सुरक्षिततेच्या सूचना
मुंबई पालिकेचे उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादार यांनी मार्गदर्शनपर भाषणात उपस्थितांना वृक्ष छाटणी करताना नागरिकांच्या व कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या सूचना दिल्या. तसेच पावसाळ्यात आपत्कालीन कक्ष व विभाग कार्यालयातील आपत्कालीन कक्ष यांच्याशी समन्वय साधून मुंबईकरांना जास्तीत-जास्त योग्यप्रकारे सेवा देण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06203 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top