
मुंबई विद्यापीठाकडून झाकीर हुसेन यांना एल.एल.डी मानद
मुंबई, ता. ११ : मुंबई विद्यापीठाच्या वतीने जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना एल.एल.डी व प्रसिद्ध उद्योजक शशिकांत गरवारे यांना डी.लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. ही मानद पदवी गुरुवारी (ता. १२) विशेष दीक्षान्त समारंभामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान केला जाईल. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाने हा विशेष दीक्षान्त समारंभ सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या फोर्ट येथे सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने यावर्षी जागतिक कीर्तीचे तबला वादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना डॉक्टर ऑफ लॉ (एल.एल.डी.) ही मानद पदवी तसेच गरवारे उद्योजक समूहाचे प्रमुख शशिकांत गरवारे यांना त्यांच्या कार्यातील योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ लीटरेचर (डी.लिट.) ही मानद पदवी देण्याचा निर्णय विद्यापीठ प्राधिकरणाने घेतला आहे. यानुसार ही मानद पदवी देण्यात येईल. यापूर्वी विद्यापीठाने प्रसिद्ध कृषितज्ज्ञ स्वामिनाथन यांना डी. लिट ही मानद पदवी देण्यात आली होती. विशेष दीक्षान्त समारंभानंतर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचा व इतर विशेष कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या विशेष दीक्षान्त समारंभाचे थेट प्रक्षेपण यु-ट्युबवर https://m.youtube.com/c/UniversityofMumbai_UoM या लिंकवर करण्यात येईल.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06206 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..