डॉ. आंबेडकरांचे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण होईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. आंबेडकरांचे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण होईल
डॉ. आंबेडकरांचे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण होईल

डॉ. आंबेडकरांचे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण होईल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : दादर येथील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहेत. यासाठी सरकार आवश्यक निधी उपलब्ध करून देत असून मार्च २०२४ पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. स्मारकाच्या सद्यस्थितीबद्दल बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुंडे बोलत होते. या बैठकीत शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, वास्तुविशारद शशी प्रभू, सहसचिव दिनेश डिंगळे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

या वेळी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, स्मारक उभारणीसाठी प्रगती तक्ता तयार करून दर पंधरा दिवसांनी या कामाच्या प्रगतीचा अहवाल घेण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती धोरण निश्चितीसंदर्भातील सर्व कार्यवाही पार पाडण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पाठपुरावा करावा. हे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. स्मारक उभारणीचे काम जरी एमएमआरडीएकडे असले तरी राज्य सरकारने इंदुमिल स्मारक उभारणीच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात या कामासाठी लागणारा निधी विहित वेळेत उपलब्ध करून देणे तसेच वेळोवेळी कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल तपासणे हे काम सातत्याने सुरू आहे. या स्मारकासाठी लागणारा निधी तात्काळ एमएमआरडीएला वितरण करण्याचे निर्देशही मंत्री मुंडे यांनी दिले. या वेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर.श्रीनीवासन यांनी या परिसरात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती सादरीकरण करून तसेच प्रत्यक्ष भेट देऊन सांगितली. प्रवेशव्दार, स्मारक इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, बेसमेंट वाहनतळ याबद्दल सविस्तर माहिती दिली.
........
पंधरा दिवसांनी कामाचा आढावा घेणार
मंत्रीमंडळाने धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाचे सनियंत्रण व जलदगतीने काम पूर्ण करणे यासाठी उपसमिती नेमली आहे. या उपसमितीमध्ये मुंडे यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. या स्मारकाचे काम जलदतीने पूर्ण व्हावे यासाठी दर पंधरा दिवसांनी या कामाचा आढावा घेणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06207 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top